व्यसनाला वेसण काळाची गरज....*
*one concept....**एक विचार ,श्रेष्ठ आचार .*
*आजची तरुणाई हि व्यावहारिक, हुशार आणि आपल्या करिअर बद्दल वास्तववादी नाही तर अभ्यासापासून दूर जात असताना दिसते केवळ व्यसन आणि फॅशन च्या आहारी जाऊन चंगळवादी झाली आहे 100 रू कमवताना व 400 रू खर्च करतांना अव्यवहारिक असे जीवन जगत आहे भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावर असून इथल्या कृतीशील तरुणांचीघटती संख्या आणि त्याच्या उत्तरोत्तर होणारी अधोगती हि खरचं चिंतेची बाब झाली आहे . तंत्रज्ञान आणि वाढत्या स्पर्धेमध्ये विविध क्षेत्रांशी, देशांशी संबंध जोडणारी हि पिढी भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी उत्तम कामगिरी करतेय यात वाद नाही पण शासकीय मोफत योजनामुळे आलेले निष्क्रियत्व व नाउमेद वृत्तीही दिसल्याशिवाय रहात नाही.या म्हणून जात , वर्ग, वंश, शहरी, ग्रामीण, असा भेद वाढताना दिसतो तरी स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्याची हि मुख्य लढाई आहे हे वास्तव दररोजनजरेस पडत असतं.तरी या सर्व प्रवाहात येणाऱ्या ताणतणावाला तितक्या सक्षमपणे हि पिढी हाताळताना दिसतं नाही.*
*दारू विकणाऱ्यांच घरं बांधली जातात आणि पिणाऱ्यांच विकले जातात त्यांना हे कळत नाही की दारु पिऊन घरे उभं करता येत नाहीत ,तर उध्वस्त करता येतात.*वाढत्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे हि पिढी व्यसनाधीन झाली आहे. करिअरच्या मागे धावण्यात अधिकाधिक वेळ जात असल्याने या पिढीच्या वैयक्तिक आयुष्यात बरीच हालचाल होताना दिसते. त्यामुळे हि पिढी कुठेतरी मानसिक आधार शोधण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक वेळेस परस्परांमध्ये होणारे मतभेद गरजांची अपूर्णता, शौक म्हणून व्यसन केलं जात, पण काही काळानंतर हे व्यसन हे त्याच्या आयुष्यांच्या अविभाज्य भाग बनतो. संपूर्णपणे व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत त्यांची जाणीवही त्यांना होत नाही .*अंमली पदार्थाचं सेवन करन, धुम्रपान करण, मद्यपान करण, हे काही निव्वळ श्रीमंत वर्गा पुरत मर्यादित नाही तर ग्रामीण भागात सुद्धा तरुण मोठ्या प्रमाणावर व्यसनात आकंठ बुडालेले आपल्याला पाहायला मिळतात. या तरुणांसाठी अनेक वेळा शहरापासून थोड्या दूर असलेल्या पब्ज, डिस्को किंवा हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर पार्ट्या आयाजित केल्या जातात.आज खूपच कमी वयात व्यसनाधीन झालेली मुल आजकाल मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. शाळेमधील विद्यार्थ्यालाही अंमली पदार्थाची सवय लागल्याच्या अनेक घटना आहेत.*त्याच बरोबर ग्रामीण भागात पैसेवाले राजकारणी माणसे तरुणांना व्यसन करण्यास प्रेरित करतात . मोठ्या उद्योगपती लोक ही निवडूनक काळात चार पैसे फेकुन तरुणांचा वापर करण्यात ते माहीर असतात पणतरुणांच्या भविष्याकडे पाहिलं जात नाही.आजचा तरुण जागृत झाला पाहिजे. आपला उपयोग एखाद्या व्यक्ती साठी न होता तर तो संपुर्ण गावासाठी झाला पाहिजे.हे काळाची नितांत गरज आहे.*
*be carefully.*
*एक आदर्श समाज घडला गेला पाहिजे आणि ईतिहासात या गोष्टींची दखल सुद्धा ....*त्यामुळे अशा पिढीचा देशाला काही उपयोग होईल का हि शंकाच आहे. महाराष्ट्र राज्याने गेल्या कित्येक वर्षापासून व्यसनमुक्तीसाठीविविध उपक्रम हाती घेतले पण व्यसनमुक्त भारत निर्माण करण्यासाठी निव्वळ योजना राबवून उपयोग नाही. तर या पिढीची क्मानासिकता बदलण्यासाठी गरज आहे. कोणत्याही कठीण परिस्थितीचा सन्मान कराण्यासाठी त्यांना तयार करण्यासाठी आवश्यकता आहे. आयुष्यातनातेसंबंधातील ताणताणाव दूर करण्यासाठी व्यसनाचा आधार घेण्याची गरज हे त्यांना पटवून देण्याची गरज आहे तसचं अनेकवेळा सोशल मिडीयाच्या माध्यमातून रेव्ह पार्ट्या, आयोजन केले जात त्यामुळे सायबर गुन्हे विभागाने याकडे लक्ष दिल पाहिजे. व्यसनमुक्तता हे काही एका दिवसाचे काम नाही, पण योग्य मार्ग अवलंबून तरुणांना या व्यसनांच्या जाळ्यातून मुक्तता मिळवून दिली पाहिजे.
*अशा प्रकारे आपली मानसिकता बदलली पाहिजे.*