सकाळची फिरस्ती
तो दिवस अजूनही मला आठवतो त्यादिवशी भल्या पहाटे उठून मी फिरायला निघालो तसा तर रोजच जायचो पण त्या दिवशी जरा लवकरच जाग आली आणि निघालो रस्ता निर्माणुष्य होता गल्लीच्या छोट्या रस्त्यातून हायवेला लागलो हायवेला भरता वेगाने जाणाऱ्या त्या वाहनांच्या टायरचा आवाज आणि जवळूनच भर रक्कम जाणाऱ्या त्या वाहनाचा भीतीदायक चर्रर्रर्रर्र असा आवाज बऱ्याच दूरपर्यंत गेल्यानंतर त्या ठिकाणी एका फरशीच्या कडेला माशा घोंगावताना दिसल्या जवळ जाऊन पाहिलं तर एक माणसाचं प्रेत अक्षरशा डोक्याचा चंदामेंदा झालेला अंगात चौकडीच्या शर्ट उजव्याकडची बाजू फाटलेले होते एक पाय दुमडून एक सरळ बहुदा दुमडलेला पाय हा मोडलेला असावा रस्त्याच्या कडेला पाहिलं तर कोणीतरी पाय धरून ओढलेलं दिसलेलं बहुदा रात्रीची घटना असेल कैक वाहन जाऊन कोणाचेही त्या ठिकाणी नामूशा न राहता समोरची ती व्यक्ती तिच्या कर्मनिधानाला पोचलेली होती
मनात अनेक कल्पना अनेक संशय अनेक त्या ठिकाणी विचार व्यक्त होत होते खून की अपघात व्यसनी असेल की निर्व्यसनी संसारी असेल की पोरका अनाथ मनात धस झालं माणसाचं जीवन किती नश्वर आहे याचे प्रात्यक्षिक मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होतो आणि दिवस उजाडल्यानंतर याचं काय होईल याचाही त्या ठिकाणी विचार करत होतो गर्दी होईल त्याच्यापासून दहा फूट लांब उभे राहतील पोलिसांना बातमी देता देणारही नाही कोणी नको बा उगीच पंचायत आपल्या मागेच पेखंड लागेल का उगीच विनाकारण लफड्यात पडायचं पोलिसांचं काही खरं नाही अशा विचारांनी त्या ठिकाणी माणुसकी हरवल्याचं दर्शन ही माझ्या एका मनाच्या कोपऱ्यात होत
परंतु मी ठरवलं माणुसकी धर्माने त्या प्रेताची अवहेलना होऊ नये म्हणून आणि त्याच्या अनभिज्ञ कुटुंबाला त्याबद्दल लवकरात लवकर माहिती मिळावी आणि त्यात प्रेताची विल्हेवाट लावून त्या ठिकाणी त्यांना मनःशांती मिळावी या हेतूने प्रेरित होऊन मी सकाळी माझ्या एका पोलीस मित्राला कळवलं मला काळ वेळ सांगता आली नाही मला जास्त काही वर्णन करता आलं नाही एक व्यक्ती या जगातून कुणाच्यातरी असत हेतूने वाकपट बुद्धीने वा अचानकपणे अनावधानाने या जगाचा निरोप घेतला आता माझे विचार चक्र पोलिसांबद्दल फिरू लागले कसा लावतील ते त्या अनभिज्ञ वाहनाचा शोध कसा गवसेल तो ज्याने हे गैर कृत्य केलं एकाने ठोकलं असेल दुसरा तिसरा चौथा त्या ठिकाणी वाहन त्याच्यावरून घेऊन गेला असेल त्याची बायका मुलं अचानकपणे त्याचा मृतदेह पाहिल्यानंतर त्यांच्यावर मनावर काय देतील याची कल्पना करतच मी घरी परतलो आणि त्या दिवसापासून ठरवलं आपल्याकडून अशा प्रकारचं चांगलं कर्म होणं हे खूप महत्त्वाचा आहे नवे नवे तो माणुसकीचा एक भाग आहे जर त्या प्रेताचा तपास लागला असता तर आपण घरी जाऊन सुद्धा त्याच्या कुटुंबीयांना मोठा आधार दिला असता परंतु ती अनाकलनीय गोष्ट होती
चेहऱ्याच्या चंदामेंदामुळे त्याची ओळख पटत नव्हती तो इथला की बाहेरचा क्लीनर की ड्रायव्हर बाकी क्रमशः